top of page

माझ्या बद्दल

Gaurav Nayakwadi

मा. गौरव किरण नायकवडी 
चेअरमन, हुतात्मा सहकारी दुध उत्पादक संघ मर्या. वाळवा. मु. पो. वाळवा, ता. वाळवा जि. सांगली. (महाराष्ट्र राज्य), पिन : ४१६३१३.

कौटुंबिक माहिती :


आजोबा : थोर स्वातंत्र्यसैनिक, पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी, संस्थापक, हुतात्मा शिक्षण व उद्योग समुह, वाळवा.
वडीलांचे नाव : मा. किरण नागनाथ नायकवडीचे चेअरमन - हुतात्मा सहकारी बँक लि. वाळवा. प्रगतशिल शेतकरी
चुलते :  स्व. अरुण नागनाथ नायकवडी

मा. चेअरमन - हुतात्मा सहकारी बँक लि. वाळवा.
मा. वैभव नागनाथ नायकवडी

चेअरमन - पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सह. सा. का. लि. नागनाथअण्णा नगर, वाळवा.

मार्गदर्शक, हुतात्मा शिक्षण व उद्योग  समुह, वाळवा.

चुलती : श्रीमती डॉ. सुषमा अरूण नायकवडी
प्राचार्या, क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालय, वाळवा. जि. सांगली.
मा. सभापती, महिला व बालकल्याण समिती - जिल्हा परिषद सांगली.
सौ. नंदीनी वैभव नायकवडी - कार्यवाह - हुतात्मा बझार, वाळवा.

संघटनात्मक व संस्थात्मक कार्य :

1. संस्थापक - स्व. अरूण भैय्या नायकवडी, कला, क्रिडा व सांस्कृतिक मंडळ, वाळवा जि. सांगली.

2. चेअरमन - हुतात्मा सह. दुध उत्पादक संघ मर्या; वाळवा जि. सांगली.

3. संस्थापक - महालक्ष्मी उद्योग समूह वाळवा.

4. उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य धरण व शेतकरी परिषद

5. प्रमुख संघटक महाराष्ट्र राज्य धरणग्रस्त संघटना

6. कार्याध्यक्ष - सांगली जिल्हा खो खो असोसिएशन

7. अध्यक्ष - सांगली जिल्हा बेस बॉल असोसिएशन

8. युवा नेते हुतात्मा शिक्षण व उद्योग समुह, वाळवा.

9. सरपंच सलग १० वर्षे वाळवा ग्रामपंचायत, वाळवा.

शिक्षण :

शालेय व महाविद्यालयीन शिक्षण वाळवा येथे हुतात्मा किसन अहिर विद्यालय, वाळवा व क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालय, वाळवा, जि. सांगली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच युवकांचे नेतृत्व व क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालयाचे यु. आर. (UR ) म्हणून बिनविरोध निवड.

हुतात्मा स्मारक सुशोभिकरण :

महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच वाळवा येथील हुतात्मा स्मारकाचे सुशोभिकरण करून तो परिसर देशात स्वच्छ व सुंदर बनविला व तेथे वाचनालय व क्रिडांगण बनविले.

खेळ व क्रिडाप्रेम :

वाळवा ही क्रिडा पंढरी आहे. संपूर्ण देशात वाळव्याचा खेळाच्या बाबतीत नावलौकीक आहे. शाळा व कॉलेजमध्ये अनेक खेळाडू राज्य व राष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या खेळात चमकतात. विशेषतः खो-खो हा वाळव्याचा प्राण आहे शिवाय कबड्डी आणि कुस्ती अशा मैदानी खेळातील होतकरू खेळाडूंना प्रोत्साहन देवून त्यांना सर्व प्रकारची मदत दिली आहे. शिवछत्रपती पुरस्कार खेळाडू घडविले. भाऊंच्या प्रेरणेने अनेक खेळाडूना अनेक पुरस्कार मिळाले व नोकऱ्याही मिळाल्या आहेत. त्यामुळे भाऊ युवकांचे आयडॉल बनले आहेत.

राजकीय व सामाजिक कार्य

  1. आष्टा कत्तलखाना विरोधी आंदोलन : आष्टा येथे मोठा कत्तलखाना होणार होता, त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. लोकांचा त्याला विरोध होता मात्र आंदोलनाला नेतृत्व मिळत नव्हते. परिसरातील अनेक लोक येवून भाऊंना भेटले व त्यातून गौरव भाऊंनी लोकांना एकत्र करून नियोजनबध्द हजारो लोकांचा मोर्चा काढला व त्यातून तो कत्तलखाना बंद झाला. भाऊंच्या जीवनातील हा पहिला यशस्वी लढा होय.

  2. सलग १० वर्षे वाळवा गावचे सरपंच : गौरवभाऊ सलग १० वर्षे वाळवा गावचे सरपंच होते. त्यांच्या काळात कोट्यावधी रूपयाचा निधी शासनाकडून आणून अनेक नागरी सुविधा निर्माण केल्या. विशेषतः गटार योजना, पेयजल योजना, निर्मळ गांव योजना, तंटामुक्त गांव या योजनेद्वारे गावाचा कायापालट केला. या रचनात्मक विकास कामामुळे भाऊ अल्पावधीत लोकप्रिय युवक नेते झाले. त्यांच्या काळात भ्रष्टाचारमुक्त प्रशासन ही अभिनव योजना त्यांनी राबविली. यामुळे सामान्य माणसाला दिलासा मिळाला. त्यामुळे भाऊ लोकप्रिय बनले. आज अखेर वाळवा गावची सत्ता गौरव भाऊंच्या नेतृत्वाखाली हुतात्मा पार्टीकडे आहे.

  3. धरणग्रस्तांचे नेतृत्व : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या निधनानंतर धरणग्रस्ताचे आंदोलन, चळवळ मंदावली होती. त्याला गती देण्याचे काम गौरवभाऊ यांनी केले. अनेक वर्षांचे प्रलंबित  प्रश्न भाऊंनी मार्गी लावले. धरणग्रस्तांच्यासाठी भाऊ स्वतः १० दिवस चांदोली धरणावर घोंगडयावर मुक्काम केला. त्यामुळे भाऊ धरणग्रस्तांच्या गळ्यातील ताईत बनले.

  4. महापुराच्या काळात पूरग्रस्तांना वैयक्तिक आणि शासकीय मदत मिळवून दिली.

  5. कोरोना काळात अनेक लोकांना वैयक्तिक आणि शासनाची मदत केली.

  6. वाळवा शिरगाव पुलासाठी प्रशासकीय मंजुरी घेवून आर्थिक तरतूद करून घेतली आणि प्रत्यक्ष कामास सुरुवात केली. यामुळे कित्येक वर्षाचा रखडलेला प्रश्न मार्गी लागला, शिरगावच्या ग्रामस्थांची कायमस्वरूपी सोय झाली.

  7. वाळवा येथील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी जल जीवन योजने अंतर्गत मंजुरी घेवून 8 कोटी रुपयांच्या कामास सुरुवात.

 

संस्थात्मक कार्य :

1.सन २०१६ पासून हुतात्मा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या काळात वितरण व संकलनामध्ये वाढ झाली असून अनेक नवीन उत्पादने निर्माण केली जात आहेत. दुधाला योग्य भाव दिल्यामुळे दुध उत्पादक शेतकरी भाऊंच्या नेतृत्वावर खुष आहेत.

2. शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव देण्यासाठी आणि युवकांना रोजगार देण्यासाठी महालक्ष्मी शेतकरी  उत्पादक उद्योग समूहाची स्थापना केली. ऊसा व्यतिरिक्त द्राक्षासहीत विविध फळे व भाजीपाला यांच्यावर प्रक्रिया करण्याच्या महत्वकांक्षी प्रकल्पाची स्थापना व त्यामधून शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य दर मिळावा यासाठी हा प्रकल्प कार्यरत करणार आहे.

गौरव भाऊच्या व्यक्तीमत्वाचे गुण

१) कुशल संघटक

२) आदर्श युवा नेता

३) कार्यतत्पर

४) गतीमान नेतृत्व

५) संयमी, शांत, अभ्यासू नेतृत्व

६) वाळवा परिसरातील विकासाची दूरदृष्टी असणारा युवा नेता.

७) समाज सेवेचा वसा आणि वारसा लाभलेले नेतृत्व

८) पारदर्शक व लोकप्रिय युवा नेता.

क्रांतीभूमीतील तेजस्वी युवा नेतृत्व मा. गौरव (भाऊ) किरण नायकवडी

उत्तरवाहिनी कृष्णामाईच्या कुशीत वसलेले अत्यंत संपन्न आणि ऐतिहासिक वारसा असलेले गाव. संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर 'वाळवा' या गावाचा नावलौकीक आहे. या गावाला भारताच्या नकाशामध्ये स्वतंत्र अस्तीत्व आहे. मात्र वाळवा या गावाने स्वतःचा एक सुंदर चेहरा निर्माण केला आहे. हा सुंदर चेहरा निर्माण करुन देण्याचे काम या देशाचे थोर सुपूत्र पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथ (अण्णा) नायकवडी यांनी केले आहे. त्यांचा जन्म याच गावात झाला. त्यांनी स्वातंत्र्य पूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात रचनात्मक कामाचा डोंगर उभा केला.

पारतंत्र्यात असलेल्या या देशाला बंधमुक्त करुन मोकळा श्वास घेण्यासाठी जी अंदोलने झाली त्यातील १९४२ ची चळवळ अंत्यत महत्वाची मानली जाते. म. गांधीजींच्या नेतृत्वाखाली झालेल्या चळवळीत सातारचे प्रतिसरकार खूप महत्वाचे आहे. या प्रतिसरकारची चर्चा दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये झाली. या प्रतिसरकारची राजधानी म्हणजे वाळवा. याच गावात प्रतिसरकारचे प्रणेते क्रांतिसिंह नाना पाटील यांचे वास्तव्य होते. त्यांचा वैचारिक वारसा नायकवडी कुटुंबाने आजपर्यंत चालविला आहे.

पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा यांनी स्वातंत्र्यानंतर स्वस्थ न बसता या देशातील तळागाळातील, रंजल्या, गांजलेल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव रस्त्यावर येऊन अनेक सामाजिक चळवळी उभ्या केल्या आणि त्या यशस्वी केल्या. त्यामध्ये धरणग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठीचा ऐतिहासिक धरणग्रस्तांचा लढा असेल किंवा आटपाडी येथील पाणी परिषदा असतील. हे दोन लढे म्हणजे अण्णांचे खूप मोठे कर्तृत्व आहे. एकिकडे विविध सामाजिक चळवळी आणि दुसरीकडे रचनात्मक उद्योग निर्मिती यातूनच 'हुतात्मा शिक्षण व उद्योग समूह. हुतात्मा सहकारी साखर कारखाना, हुतात्मा सहकारी सहकारी बँक, हुतात्मा बझार व हुतात्मा दूध संघाची निर्मिती झाली आणि संपूर्ण भारतामध्ये या समूहाने स्वतःचा एक पॅटर्न निर्माण केला आहे. प्रामाणिकपणा, काटकसर आणि तीव्र सामाजिक भान या त्रिसूत्रीवर या समूहाचे यश अवलंबून आहे. म्हणूनच संपूर्ण देशामध्ये 'वाळवा' हे सहकार आणि सामाजिक चळवळीचे तिर्थक्षेत्र बनले आहे.

या तिर्थक्षेत्राला आणखी पवित्र बनविण्याच्या उदात्त हेतूने पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा यांच्या घराण्यातील तिसऱ्या पिढीचे नेतृत्व ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतले आहे ते म्हणजे मा. गौरव किरण नायकवडी उर्फ भाऊ हे होत.

मा. गौरव (भाऊ) यांचा जन्म ऐतिहासिक वारसा असलेल्या नायकवडी कुटुंबात झाला. वडील म्हणजे मा. किरण नायकवडी (दादा) हे नागनाथ अण्णा यांचे थोरले सुपूत्र. त्यांचे चुलते मा. वैभव (काका) नायकवडी यांच्या सहकार्याने गौरव भाऊ यांचे नेतृत्व अलिकडे बहरत आहे.

मा. गौरव भाऊ यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण वाळव्यातच झाले. येथील क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या प्रेमापोटी भाऊ विद्यापीठ प्रतिनिधी (यु. आर. ) म्हणून बिनविरोध निवडून आले आणि तेथूनच त्यांच्या सामाजिक, राजकिय वाटचालीचा पाया घातला गेला. घरात सहकार आणि सामाजिक चळवळीचा प्रचंड मोठा वारसा त्यांना लाभला.

सातत्याने संघर्षमय राजकारणात कार्यकर्त्यांना तुफानाचं बळ देणारा जिगरबाज,दिलेला शब्द पाळणारा,दिलदार मित्र आणि उमद्या मनाचा नेता,तरुण वर्गामध्ये प्रचंड आकर्षण असणारा युवकांचा मार्गदर्शक,वाळवा गाव व परिसर उंचीवर नेऊन ठेवणारे व्यक्तिमत्व,कुशल संघटक, या कुशल व्यक्तिमत्त्वात युवकांना मोहित करण्याचे गुण त्यांच्यात मुळातच आहेत त्यामुळे युवकांची  प्रचंड मोठी फळी त्यांनी उभी केली आहे.

अलीकडच्या काळात अत्यंत लोकप्रिय युवा नेता म्हणून त्यांची प्रतिमा तयार झाली आहे. त्यामुळेच सहकार,समाजकारण आणि राजकारण एक समर्थ पर्याय म्हणून जनता त्यांच्याकडे पहात आहे.

 

मा. गौरव भाऊ यांनी १० वर्षे ' वाळवा ' गावचे सरपंच म्हणून काम केले आहे. त्यांच्या काळात या गावामध्ये समर्थपणे ते रचनात्मक काम उभे करत आलेले आहेत. सध्या वाळवे हे गाव संपूर्ण हागणदारीमुक्त असून उत्तम प्रतिच्या सर्व सुविधा देणारे हे एकमेव गाव आहे. नागरिकांना शुद्ध आणि वेळेवर पाणी मिळाले पाहिजे यासाठी अनेक योजना राबवून भाऊंनी वाळव्याची तृष्णा भागविली आहे. रस्ते, दिवाबत्ती आणि उत्तम प्रशासन ग्रामपचायतीच्या माध्यमातून ते देत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या नेतृत्वाखाली कत्तलखाना बंद करणे, धरणग्रस्तांसाठी त्यांना जमीनी व इतर सुविधा मिळाव्या यासाठी चांदोली धरणावर केलेले ऐतिहासिक ठिय्या आंदोलन, वाळवा व शिराळा तालुक्यातील अनेक गावातील लोकांना गावे बंद उत्स्फुर्तपणे करुन कोल्हापूर-पुणे महामार्ग बंद करुन खूप मोठे आंदोलन छेडले गेले आणि ते यशस्वी झाले. इस्लामपूर प्रांत ऑफीसवर भव्य मोर्चा काढून धरणग्रस्तांना न्याय मिळवून दिला. त्यामुळे मा. गौरव भाऊंच्यावर या परिसरातील लोकांची श्रध्दा वाढत आहे. मा. गौरवभाऊ सातत्याने जनसंपर्कात असतात. पंचक्रोशीमध्ये बरे-वाईट काहीही घडले तर तिथे कौतुकासाठी किंवा मदतीसाठी सर्वात प्रथम भाऊ धावून जातात. तिथे गेल्यानंतर इतर नेत्यांसारखे अलिप्त न राहता सर्वसामान्य माणसात मिसळून जातात. कोणताही मोठेपणा नाही की बडेजाव नाही. सहज, साधे, निर्मळ असे भाऊ सामान्य जनतेबरोबर वागतात. म्हणून अल्पावधीत ते जनमानसाच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. निगर्वी साधेपणा, सतत कार्यमग्नता आणि स्वच्छ चारित्र्य या त्रिसूत्रीवर मा. गौरव भाऊंचे व्यक्तिमत्व उभे आहे. एखाद्या कामाचा ध्यास घेतल्यानंतर ते काम पूर्ण करुनच स्वस्थ बसण्याचे शिक्षण त्यांनी पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा यांचे कडून घेतले आहे.

अगदी अलिकडेच त्यांच्याकडे हुतात्मा सह. दूध उत्पादक संघाचे चेअरमन म्हणून काम पाहताहेत. आज हुतात्मा दूध ब्रॅण्डने राज्यभर लोकांचा विश्वास संपादन केला आहे. तसेच राजकारणामध्ये जिल्हा परिषदेवर आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्या चुलती श्रीमती डॉ. प्रा. सुषमा अरुण नायकवडी यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेवर महिला व बालकल्याण सभापती पद घेतले व लोकांच्या अडचणी सोडवल्या आहेत.

२०१९ लोकसभा निवडणूकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या विजयामध्ये गौरवभाऊंचा सिंहाचा वाटा आहे नंतर, इस्लामपूर मतदार संघातून विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करुन कमी कालावधीमध्ये लक्षणीय असे मते घेऊन प्रस्थापितांचे लक्ष वेधून घेतले.

 

दि. १८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर पर्यंत आष्टा येथे धरणग्रस्तांचे ठिय्या आंदोलन यशस्वी करून दोन हेक्टरवरील नगरपालिका व स्थानिक नागरिकांचे अतिक्रमण झाले होते. १९८४ पासून लोकांचे भूखंडाचे ७/१२ उतारे करून देणे ह्या मागण्या होत्या. १६ व्या दिवशी दोन हेक्टर जमीनीवरील अतिक्रमणे काढणे व भूखंडाचे आदेश वाटप मा. गौरवभाऊंच्या नेतृत्वाखाली मान्य करण्यात आले.

सध्या सहकार, सामाजिक चळवळी आणि राजकारणासाठी मा. गौरव भाऊ यांनी पूर्ण वेळ स्वतःला झोकून दिले आहे. येणाऱ्या काळात त्यांचे नेतृत्व लोकांच्यातून  विलक्षण गती घेईल आणि दीर्घकाळ प्रतिक्षेनंतर या परिसरातील लोकांना आपल्या हक्काचा, घरातील, विश्वासाचा, प्रामाणिक, कार्यमग्न, निगर्वी नेता मिळेल...

bottom of page