top of page

Gaurav Nayakwadi

नेतृत्वाला अनुवंशिक वारसा असण्यापेक्षा विचारांचा वारसा महत्वाचा असतो. क्रांतिवीर नागनाथअण्णा हाच मुळात एक विचार आहे. तो विचार गौरव नायकवडी आपल्या प्रत्येक कृतीमधून अधिक दृढ करत आहेत. प्रबळ, संघटन, कौशल्य, संघर्षासाठी टोकाची भूमिका घेण्याची तयारी आणि विकासाची दूरदृष्टी या त्रिसूत्रीवर भाऊंचे नेतृत्व अल्पावधीत नावारूपाला आले आहे. प्रस्तापित वर्गापेक्षा सामान्य माणूस हाच भाऊंचा खरा कार्यकर्ता आहे. भाऊ सहज माणसात मिसळतात आणि पाहता पाहता सर्वांचे होवून जातात. शिक्षण, सहकार, क्रीडा, प्रशासन आणि समाजकरण ही भाऊंची कार्यक्षेत्रे आहेत. क्रंतिभुमिला उज्ज्वलभुमी करण्याचे स्वप्न घेवून गौरव भाऊ राजकारण करतात. चला तर मग भाऊंना वाळवा तालुक्याच्या केंद्रस्थानी आणुया.

आमचा नेता गौरवभाऊ नायकवडी

Gaurav Nayakwadi
Gaurav Nayakwadi

संघर्ष हाच कार्याचा आत्मा

वाळव्याच्या क्रांतिभुमीचे बाळकडू घेवून, प्रत्येक गोष्ट संघर्षातून मिळवण्याची जिद्द असणारा, गाव,समाज,देश आणि बहुजनांसाठी लढणारा संघर्षयोद्धा म्हणजे गौरवभाऊ

img_1_1694588420543-01.jpeg

माझ्या बद्दल आपणास काही समजावून घ्यायचे आहे का? चला तर माझी माहिती जाणून घेवू... माझ्या परिवारात आपले स्वागत आहे.  मी गौरव किरण नायकवडी. तुमच्या सगळ्यांचा हक्काचा भाऊ. पद्मभूषण क्रांतिवीर डॉ नागनाथ अण्णा नायकवडी यांचा नातू. तीर्थरूप क्रांतिवीर अण्णा आणि क्रांतीमाता लक्ष्मीबाई नायकवडी यांचे संस्कार घेवून गेली दशकभर समाजसेवेचा उज्ज्वल वारसा चालवत आहे.

न्याय हक्कासाठी आंदोलने, मोर्चा, चळवळी ही माझी ऊर्जा स्तोत्रे आहेत.आज समाजसेवेसाठी राजकारण अनिवार्य झाले आहे.सत्तेचा वापर करून जनतेसाठी काम करणे हे ध्येय ठेवून मी राजकारण करतो.आपल्या सर्वांसाठी रस्त्यावरची लढाई करत समर्थ समाज निर्माण करणे,बेरोजगारांना रोजगार देणे,सशक्त व संस्कारित युवक घडवणे, चांगला माणूस व उपयोगी नागरिक निर्माण करणे, हरित आणि धवल क्रांती मधून सामान्य माणसाच्या बळ निर्माण करणे हेच माझे ध्येय आहे.पण माझा प्रवास कसा आहे? हे जाणून घेवून, या प्रवासात तुम्हाला माझे साथीदार व्हायचे आहे का?

चला तर मग माझ्या परिवारात आपले स्वागत आहे.

घडामोडी

  • Whatsapp
  • Instagram
  • Facebook
  • Twitter

Gaurav Nayakwadi, Walwa, Islampur

bottom of page